विक्रेता नोंदणी

आपण पर्यावरण-पूरक (eco-friendly) उत्पादने बनवता का? अगदी घरगुती-लघुउद्योगापासून ते पर्यावरण विषयक तांत्रिक उत्पादने आणि सेवा पुरवणार्‍या सर्वांनाच, आमचे व्यासपीठ ‘पर्यावरणाविषयी जागृक’ ग्राहकांपर्यंत पोहोचण्यात मदत करेल. आमच्या व्यासपीठाचा लाभ घ्या, आपल्या सेवा/ उत्पादनांची विक्री आणि जाहिरात करा. 

लेखक नोंदणी 

लेखनी मध्ये परिवर्तनाची प्रचंड ताकद असते! आपल्या लेखन कौशल्याचा वापर करून पर्यावरण विषयक जागृती घडवून आणा. आपले पर्यावरण विषयक साहित्य (लेख, कविता, लघुकथा इ.) आमच्या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रकाशित करा. 

जुनं ते सोनं 

‘हरित मराठी’ चा प्रत्येक अंक उपयुक्त माहितीने परिपूर्ण असतो. या सर्वच अंकांचा लाभ आमच्या वाचकांना व्हावा आणि त्यांचा आस्वाद कधीही घेता यावा या हेतूने आम्ही आमचे सर्व अंक येथे संग्रहित करून ठेवले आहेत. यापूर्वीचे सर्व मासिक अंक आपल्याला येथे वाचता येतील.

सल्लागार/उमेदवार नोंदणी

आपण पर्यावरण किंवा इतर निगडीत क्षेत्रात कार्यरत असाल आणि आपल्या सेवांद्वारे इतरांना काही मदत करू इच्छित असाल तर अवश्य येथे सल्लागार म्हणून नोंदणी करा. आपण पर्यावरण क्षेत्रात काम करू इच्छित असाल, संधीच्या शोधात असाल तर उमेदवार म्हणून आपल्या पात्रतेची नोंदणी सुद्धा करू शकता. 

छायाचित्रकार नोंदणी

निसर्गाचे सौंदर्य आणि वैविध्य आपल्या कॅमेर्‍यात कैद करण्याचे कौशल्य आपल्याकडे असल्यास अवश्य येथे नोंदणी करा. आपल्या छायाचित्रांच्या मदतीने पर्यावरण विषयक जागृती निर्माण करण्यास हातभार लावा. आपण या व्यासपीठावर आपल्या छायाचित्रांची विक्री सुद्धा करू शकता. 

ब्लॉग

‘हरित मराठी’ च्या व्यासपीठावर नोंदणी केलेल्या उत्साही लेखक, छायाचित्रकारांच्या साहित्यकृती आम्ही आमच्या ब्लॉगवर सुद्धा प्रकाशित करतो. लेखक, विषय इ. नुसार साहित्याचे नीट वर्गीकरण करून अधिक सुसूत्र पद्धतीने ब्लॉगच्या माध्यमातून हे साहित्य वाचकांसाठी उपलब्ध करून देणे हा त्यामागचा हेतु आहे.

प्रायोजक

आपली उत्पादने/सेवा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवा! आमच्या मासिक वृत्तपत्रात जाहिरातीसाठी प्रयोजक म्हणून नोंदणी करा.