आजच्या स्पर्धेच्या युगात बाजी मारायची असेल तर नोकरीसाठी येणार्या हजारो अर्जांमध्ये उठून दिसेल अशी प्रतिमा (इंप्रेशन) तयार करणे खूप महत्वाचे आहे. रिक्रूटरच्या मनात चांगली प्रतिमा निर्माण करण्यासाठी आपल्या सीव्हीला मिळतात फक्त काही सेकंद! आणि म्हणूनच आपला सीव्ही त्या-त्या विशिष्ट नोकरीनुरूप असला पाहिजे.
‘हरित मराठी’ च्या ‘सीव्ही स्कॅन’ सेवेद्वारे आम्ही याच कामात आपली मदत करू. आपल्या सीव्हीची मांडणी (आपण अर्ज करू इच्छिता) त्या विशिष्ट नोकरीसाठी योग्य आहे का याची आम्ही तपासणी करू आणि आवश्यक ते बदल करण्यास मार्गदर्शन सुद्धा करू. यासाठी इंग्रजी मध्ये सीव्ही पाठवणे गरजेचे आहे. तपासणीचा अहवाल आणि आवश्यक ते बदल आम्ही आपल्याला मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषांमध्ये ई-मेल द्वारे कळवू.
या सेवेचे शुल्क मर्यादित काळासाठी फक्त रुपये १००/- इतके आहे.
आपण परदेशात नोकरी करण्यास उत्सुक असाल तर त्यासंबंधीचे मार्गदर्शन सुद्धा आम्ही देऊ.
आजकाल, आपली उत्पादने/सेवा/उपक्रम यांचा प्रभावीपणे प्रचार आणि प्रसार करायचा असेल तर व्हिज्युअल इमेजेस किंवा ग्राफिक्स यांना पर्याय नाही. आपली उत्पादने/ सेवा आकर्षक शैलीत ग्राहकांपर्यंत पोहोचवणारे ग्राफिक डिझाइन, सोशल मीडिया ग्राफिक्स, सादरीकरणे, पोस्टर्स आणि इतर विपणन साहित्य आम्ही अत्यल्प दरात बनवून देऊ.
आपल्या व्यवसाय वृद्धीसाठी आजच आमच्या सेवांचा लाभ घ्या!
सारं जग आता ऑनलाइन झालंय. नोकरी मिळवण्याच्या कामात प्रभावी ठरत आहेत ‘लिंक्डइन’ सारखी समाज माध्यमं आणि म्हणूनच ‘लिंक्डइन’ सारख्या माध्यमावर आपलं अस्तित्व प्रभावीपणे सिद्ध करणं ही आजच्या काळाची गरज बनली आहे. ‘लिंक्डइन’ जिंकलं तर नोकरीसाठीचे असंख्य मार्ग आपल्याला खुले होतात.
‘हरित मराठी’ च्या सेवेचा लाभ घ्या; लिंक्डइन च्या माध्यमातून आपली योग्यता प्रभावीपणे जगासमोर मांडा. आपलं लिंक्डइन प्रोफाइल प्रभावी बनवण्यास आम्ही आपल्याला मदत करू. आपल्या प्रोफाईलची लिंक आम्हाला पाठवा.
या सेवेचे शुल्क मर्यादित काळासाठी फक्त रुपये १००/- इतके आहे.
‘Marathi’ is the mother tongue of 83.1 million people in India and 68 million people worldwide. With environmental-related information scarcely available in this language, we offer translation services to businesses and institutions to bring this gap and to promote their environmental services, products, and campaigns, effectively.