समविचारी संस्था

‘आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत’ या संकल्पनेवर आधारित ‘हरित मराठी’ हे आमचं व्यासपीठ. 

खरं तर ‘हरित मराठी’ हे फक्त व्यासपीठ नाही; ती एक मोहिम आहे. पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन या हेतूने सुरू केलेली मोहिम! मात्र, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धन हे काही एकट्या दुकट्याने प्रयत्न करून साध्य होणारं ध्येय नाही, यासाठी गरज आहे सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची! आणि म्हणूनच या मोहिमेला गरज आहे तुमच्या सारख्या पर्यावरणाविषयी जागृक समविचारी संस्थांची. आपणही समान ध्येयाने प्रेरित असाल, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असाल आणि मराठी भाषिकांपर्यंत पोहोचण्यास प्रयत्नशील असाल तर आपल्याला एकत्र येऊन बरंच काही करता येईल.

उदाहरणार्थ: 

  • शैक्षणिक आणि रोजगार निर्मिती संदर्भातील वेबिनार - YouTube LIVE 
  • पर्यावरण विषयक तांत्रिक आणि वैज्ञानिक कागदपत्रांची निर्मिती आणि भाषांतर 
  • संशोधन आणि सर्वेक्षण इ. 

‘हरित मराठी’ या व्यासपीठाच्या माध्यमातून, पर्यावरण क्षेत्रात कार्यरत असणार्‍या आपल्या सारख्या विविध संस्थांची यादी तसेच माहिती ग्राहक आणि व्यवसायिकांना ‘समग्र निर्देशिकेच्या’ म्हणजेच ‘Comprehensive Directory’ च्या स्वरुपात उपलब्ध करून देता येईल आणि याचा उपयोग एकूणच पर्यावरण विषयक हालचालींचा वेग वाढवण्याच्या कामी होईल. 

चला तर मग, ‘पर्यावरण संरक्षणाच्या’ सद्हेतुने एकत्र येऊया !  आम्ही आपल्यासोबत काम करण्यास उत्सुक आहोत, आजच आमच्याशी संपर्क साधा. 

शुभस्य शीघ्रम |

आपल्या संस्थेच्या कामाची माहिती आमच्या वृत्तपत्रात प्रकाशित करण्यात येईल तसेच संस्थेचा लोगो सुद्धा आमच्या संकेतस्थळावर येथे (https://www.haritamarathi.com/partners) प्रसिद्ध केला जाईल. 

‘हरित मराठी’ खलील क्षेत्रात कार्यरत समविचारी संस्थां/ व्यक्तींसोबत काम करण्यास उत्सुक आहे: 

  • शिक्षण (राष्ट्रीय/अंतराष्ट्रीय ) 
  • इंटर्नशिप 
  • हरित तंत्रज्ञान 
  • व्यवसाय विकास 
  • अंतराष्ट्रीय विपणन (Marketing) 
  • मीडिया/थिएटर  
  • समाजसेवी संस्था (NGO) 
  • स्वयंसेवक 
  • मार्गदर्शक 
  • साहित्यिक  
  • सेलेब्रिटी 
समविचारी संस्थांची यादी (प्रगतिपथावर....) 
सौर तंत्रज्ञान भागीदार - ग्रीन इंडिया इनिशिएटिव्ह प्रा. ली.,  मुंबई

भविष्यात येऊ घातलेल्या ऊर्जा संकटावर मात करण्याचा प्रभावी उपाय म्हणजे सौर तंत्रज्ञान! जाणून घ्या सौर तंत्रज्ञानाशी संबंधित उपयुक्त माहिती.

जल तंत्रज्ञान भागीदार - जलामृत वॉटर ट्रीटमेंट, कल्याण

‘जलं ददाति जीवनम्’ खरं आहे ना? म्हणूनच उपलब्ध पाण्याचे ‘जीवनदायी अमृतात’ रूपांतर करणारे तंत्रज्ञान सुद्धा तितकेच महत्वाचे! जाणून घ्या, ‘जल-उपचारा’ विषयी.

अन्न तंत्रज्ञान भागीदार - ब्रोटोस, मुंबई

ब्रोटोस चा असा विश्वास आहे कि 'अन्न हे पूर्णब्रह्म'. निसर्गाच्या आणि शेतकऱ्यांच्या साहाय्याने परवडणारे, झटपट आणि पौष्टिक निर्जलीकृत अंकुर ते तयार करून देत आहेत.

कचरा व्यवस्थापन भागीदार - ५ आर सायकल, मुंबई

“५ आर सायकल फाउंडेशन" ही एक ना-नफा संस्था आहे जी चांगल्या कचरा व्यवस्थापनास प्रोत्साहन देते. आपण त्यांना आपला कोरडा कचरा देऊ शकता.