‘पर्यावरण संरक्षणाचा’ प्रश्न ऐरणीवर आला आहे. आता तो सोडवणे हा फक्त एक पर्याय नाही तर ही ‘मानवी अस्तित्वाची लढाई’ बनली आहे.
यासाठी सगळ्यात सोपा आणि महत्वाचा उपाय काय असेल; तर तो म्हणजे या विषयावर ‘संवाद साधणे’, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे.
आणि, यासाठी भाषेइतकं प्रभावी माध्यम कोणतं असेल?
नेल्सन मंडेला म्हणतात तसं, ‘ तुम्ही लोकांशी त्यांना समजणार्या भाषेत बोललात तर तो संदेश त्यांच्या मेंदुपर्यंत जातो; पण जर तुम्ही लोकांशी त्यांच्या ‘मातृभाषेत’ बोललात तर तो त्यांच्या हृदयापर्यंत पोहोचतो!’
मराठी खरं तर ८३.१ दशलक्ष लोकांची मातृभाषा;
पण त्या मानाने आपल्या भाषेत ‘पर्यावरणाशी’ संबंधित माहिती मात्र अगदीच तुटपुंजी.
म्हणूनच पर्यावरणविषयक माहिती, त्या संबंधित विविध सेवा आणि उत्पादनांसाठी खास ‘मराठी’ व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे.
सर्वांच्याच एकत्रित प्रयत्नांतून पर्यावरणविषयक हालचालींना वेग यावा हाच आमचा निखळ हेतू!
या व्यासपीठाचा लाभ घ्या. आमच्या या मोहिमेत सामील व्हा.
धन्यवाद!
एकेमकांच्या मदतीने आपण काय साध्य करू शकू?
सर्वसमावेशकता: जितका जास्त सहभाग तितका विकासाचा वेग अधिक! आमच्या प्रकल्पांमध्ये सहभागी व्हा आणि इतरांना याबद्दलची माहिती द्या.
शाश्वत विकास: पर्यावरण संरक्षण- संवर्धन उपक्रमाचा एक भाग व्हा. आपल्या पर्यावरणपूरक सेवा व उत्पादनांच्या प्रसारासाठी आमच्या व्यासपीठाचा लाभ घ्या.
व्यावसायिक विकास: पर्यावरण क्षेत्रातील विद्यार्थी आणि व्यावसायिकांना मार्गदर्शन आणि उत्तेजन द्या. मार्गदर्शक किंवा सीव्ही स्कॅन सल्लागार व्हा.
ग्राहक निष्ठा: आपल्या उत्पादनांच्या विक्रीसाठी आमच्या व्यासपीठाचा लाभ घ्या. ग्राहकांची निष्ठा आणि विश्वास जिंका.
‘आपलं पर्यावरण, आपल्या भाषेत’ ही आमची मूळ संकल्पना इतर भाषांमध्ये सुद्धा राबवण्याचा आमचा मानस आहे. आपण एकत्रितपणे अश्या किंवा या सारख्या एखाद्या उपक्रमात सहभागी होण्यास उत्सुक असाल तर अवश्य संपर्क साधा. एकमेकांच्या सहकार्याने आपण पर्यावरणासोबतच एकमेकांच्या प्रगतीसाठी पोषक वातावरण निर्माण करू शकू.